- राज्य शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्फत घेण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान ४.० व ५.० या दोन्हीमध्ये शिरूर नगरपरिषदने २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या गटामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. शिरूर नगरपरिषदने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरामध्ये पर्यावरण पूरक विविध उपक्रम, जनजागृती कार्यक्रम, विविध स्पर्धा राबविण्यात आले त्याची माहिती खालील प्रमाणे.
- शिरूर नगरपरिषद हद्दीतील सिद्धीचा पहाड या ठिकाणी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. २५ गुंठे एवढ्या जागेमध्ये ६६ विविध प्रकारची १५६० रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, लाकूड उपयोगी मोठी झाडे, पानगळ होणारी छोट्या पानांची झाडे इत्यादींचा समावेश आहे.
- तसेच वनविभागाच्या ८० एकर जागेमध्ये शिरूर नगरपरिषद व विश्र्वेश्वर सामाजिक वनीकरण या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात देशी प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंपळ, कडुलिंब, वड या झाडांचा समावेश आहे.
- तसेच वनविभागाच्या ८० एकर जागेमध्ये शिरूर नगरपरिषद व विश्र्वेश्वर सामाजिक वनीकरण या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात देशी प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंपळ, कडुलिंब, वड या झाडांचा समावेश आहे.
- शिरूर नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद हद्दीत तीन ठिकाणी २४ तासांकरिता मशीन ठेवून हवा गुणवत्ता तपासणी करण्यात असून व सकाळच्या आधी व नंतर हवा गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे. तसेच नगरपरिषदेमार्फत ०२ ठिकाणी कायमस्वरूपी सार्वजनिक डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आलेले आहे
- Rain Water Harvesting असणाऱ्या मालमत्ता धारकांना करामध्ये ५% टक्के सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी Rain Water Harvesting करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
- शिरूर नगरपरिषदेमार्फत वाहणाऱ्या घोडनदीचे प्रदूषण होऊ नये याकरिता गणेशोत्सव काळामध्ये शिरूर नगरपरिषदेमार्फत मूर्ती संकलन उपक्रम राबविण्यात येतो. यामध्ये नगरपरिषदेमार्फत नागरिकांना मूर्ती नदीमध्ये विसर्जन न करता संकलन करण्यासाठी डेपो करिता आवाहन केले जाते. संकलित करण्यात आलेल्या मूर्ती पुनर्वापर करण्यासाठी पाठविल्या जातात. मूर्ती संकलनासाठी दिलेल्या नागरिकांना नगरपरिषदेमार्फत पर्यावरण दूताचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणे व कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
- शिरूर नगरपरिषदेमार्फत शहरामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी LED दिवे, सोलर दिवे बसविण्यात आलेले आहे.
- Solar Panel असणाऱ्या मालमत्ता धारकांना करामध्ये २% टक्के सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी Solar Panel बसविण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
- शिरूर नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थी/नागरिक यांच्यामध्ये चित्रकला, रांगोळी, वेस्ट टू बेस्ट व इतर स्पर्धा घेण्यात आलेल्या आहे.
- शिरूर नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळांची पर्यावरण सेवा योजना मध्ये रजिस्ट्रेशन करण्यात आले असून या अंतर्गत शाळेमध्ये बीज गोळे तयार करणे, पाणी वापराचे मूल्यमापन करणे, ऊर्जा मीटर अभ्यास इत्यादी उपक्रम घेण्यात आले आहेत.
- शिरूर नगरपरिषद हद्दीतील माझी वसुंधरा अभियानाचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी २२ ठिकाणी प्रमोशन पॉइंट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये टाकाऊ वस्तूंपासून शिल्प (Sculpture) तयार करण्यात आले आहे.
- शिरूर नगरपरिषदेमार्फत शहरामध्ये प्लास्टिक बंदी, ई-कचरा संकलन, बीज संकलन, ध्वनी प्रदूषण, फटाके बंदी, वातावरणीय बदल, आपत्ती व्यवस्थापन, नूतनीकरण ऊर्जा स्रोत वापर, थंड छत, शाश्वत सणांचा प्रचार, रेन वॉटर हार्वेस्टिंग, माझी वसुंधरा अभियान इत्यादी बाबत जनजागृती करण्यात येत आहे.



